संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य कला संचलनालय मुंबई आयोजित चित्रकला ग्रेड परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन या शासकीय इलेमेंटरी व इंटरमिजियट परिक्षेत राज्यभरातुन लाखो विद्यार्थी सहभागी झाले होते. यात आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिंडा संकुलातील एकुण १०६८ प्रविष्ठ झाले होते. पैकी ‘अ’ श्रेणीमध्ये १८५ तर ब श्रेणीमध्ये ४२६ विद्यार्थ्यांनी यश मिळवले. संकुलाचा या दोन्ही परिक्षेमध्ये १०० टक्के निकाल लागला आहे. इलेमेंटरी परिक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत आत्मा मालिक इग्लिश मिडीयम गुरुकुलाच्या पाच विद्यार्थ्यांनी पहिल्या १०० मध्ये आपले स्थान प्राप्त केले. गुणवत्ता यादीत पहिल्या १०० मध्ये स्थान मिळविलेले विद्यार्थी सुनिल वसावे २५, हार्दिय वळवी ४१, भुपेश मोरे ४४, जान्या वसावे ५६, सचिन वळवी ६२ गुणाक्रमांक मिळवून यशस्वी झाले.
या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक ज्ञानेश्वर पर्वत, मंगेश रहाणे, दत्तात्रय थोरात , निलेश सावंत, भारती भिंगारे, स्वप्निल पाटील, सोनाली ठाकूर, दिपाली निळे, संदिप धनवटे, गोकुळ गायकवाड, अविनाश चैधरी, युध्दोधन ससाणे, भिंगारे ज्ञानेश्वर, गंगाधर जाधव,श्री कडलग तसेच सर्व संकुलातील कला शिक्षकांनी आपली कला विद्यार्थी मध्ये रुजवली आणी ऐतिहासिक यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांची व कला शिक्षकांची भव्य दिव्य मिरवणूक काढली यात सर्व विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. तसेच या विद्याथ्र्यांना व कला शिक्षकांना गुरूमाऊलींनी शिर्डी-मुंबई-शिर्डी विमानप्रवासाची सहल संस्थेचे वतीने भेट म्हणून देण्यात आली. तसेच या सर्व विद्यार्थ्यांचा आत्मा मालिक माऊली, ध्यानयोग मिशनचे अध्यक्ष परमानंद महाराज, व सर्व संत मांदियाळी ,आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाअध्यक्ष भगवान दौंड, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे विश्वस्त प्रकाश भट, वसंतराव आव्हाड, प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे, प्रभाकर जमधडे, व्यवस्थापक हिरामण कोल्हे, प्राचार्य माणिक जाधव, नितीन सोनावणे, मिना काकडे, निरंजन डांगे, कांतीलाल पटेल, संदिप गायकवाड, सुधाकर मलिक, विभाग प्रमुख बाळासाहेब गाडेकर, मोतीराम कु-हे मोतीराम , दत्तात्रय जावळे ,सचिन घुंगुर्डे, दिनेश क्षिरसागर ,भारती तांबे, वैशाली खोकले, सोमनाथ होन, योगेश निळे यांनी विद्यार्थी व कलाशिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यार्थी व कला शिक्षक यांचा गुणगौरव करण्यात आला आहे.
Leave a Reply