संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहे. या देशाची भावी पिढी सक्षम होण्यासाठी या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर व्यावहारिक ज्ञान मिळणे अभिप्रेत असून तो बालआनंद मेळाव्यातून मिळत असल्याचे प्रतिपादन माजी आ.अशोक काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथे एक कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बालआनंद मेळाव्याचे उदघाटन माजी आ. अशोक काळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बालआनंद मेळाव्याचे उदघाटन माजी आ. अशोक काळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, विमल आगवन, पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे, गटविकास अधिकारी सोनकुसळे, गटशिक्षण अधिकारी पोपटराव काळे, कारभारी आगवन, वसंतराव दंडवते, सरपंच रुपाली माळी, रामकृष्ण बनकर, रामकृष्ण कोकाटे, संतोष जाधव, अनिल बनकर, रघुनाथ फटांगरे, सुरेगाव गटातील सर्व केंद्रप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बालआनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी , विविध पदार्थांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला.यावेळी आमदार अशोकराव काळे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याशी संवाद साधला तसेच अतिशय कमी वयात मुलांना मिळत असलेले व्यवहार ज्ञान बघून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. यावेळी या बाल आनंद मेळाव्यात पालक, विद्यार्थी,शिक्षक यांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केल्यामुळे शाळा परिसराला बाजारचे स्वरूप आले होते.
Leave a Reply