जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या असून कोपरगाव तालुक्यातील एकोणतीस ग्रामपंचायतींचा धुराळा उडणार आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका शिवसेनेने आगामी रणनीती ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे.त्या साठी शिवसेनेची ग्रामपंचायत निवडणूकीसाठी येत्या शुक्रवारी १८ डिसेंबरला हॉटेल विरा पॅलेस येथे इच्छुकांची बैठक संपन्न होणार असल्याची माहिती तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने आदेश काढून जुनं आरक्षण रद्द केलं आहे.खऱ्या आरक्षित माणसाला न्याय मिळण्यासाठी,घोडेबाजार थांबण्यासाठी,प्रामाणिक माणसांना न्याय मिळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यातही २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुराळा उडणार आहे.या पार्श्वभूमीवर हि बैठक होत आहे.
राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या चौदा हजार गावांमध्ये राजकीय धुरळा उडणार आहे.मात्र या संदर्भात एक महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.आता ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत पूर्ण होणार आहे.ज्या आठ जिल्ह्यात निवडणुकीआधीच सरपंचपदाचं आरक्षण जाहीर झालेलं होतं तेही या नव्या निर्णयामुळे रद्द झालं आहे.ग्रामविकास विभागाने आरक्षण सोडतीचा निर्णय घेतल्यानंतर संबंधित जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने आदेश काढून जुनं आरक्षण रद्द केलं आहे.खऱ्या आरक्षित माणसाला न्याय मिळण्यासाठी,घोडेबाजार थांबण्यासाठी,प्रामाणिक माणसांना न्याय मिळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यातही २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुराळा उडणार आहे.या पार्श्वभूमीवर हि बैठक होत आहे.
कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतच्या स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसाठी तालुक्यातील इच्छुक उमेद्वारांची पुढील विचार विनिमय करण्यासाठी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या अध्यक्षतेखाली विरा पॅलेस कोपरगाव येथे १८ डिसेंबर ला दुपारी १.०० वाजता ही बैठक पार पडणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी दिली आहे.
सर्व उपजिल्हाप्रमुख,उपतालुका प्रमुख,गावप्रमुख,शाखाप्रमुख यांच्या उपस्थितीत ग्रामिण भागासाठी महत्वाच्या असलेल्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध उमेद्वार इच्छुक असून इच्छुकांची व पदाधिकाऱ्यांची मते आणि कल जाणून घेणार आहोत अशी माहिती या वेळी तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी शेवटी दिली आहे.
Leave a Reply