जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

गिरमे कुटुंबाला त्रास देण्यासाठीच क्रीडांगणाचे भूत उभे केले-नगराध्यक्ष वहाडणे

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत असल्याने गिरमे कुटुंबाला त्रास देण्यासाठीच क्रीडांगणाचे भूत पुढे करून त्या कुटुंबाला वेठीस धरण्यासाठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्यापासून त्रास देण्याचे काम सुरु असून आज दुसऱ्या पिढीतही हाच एकसूत्री काम सुरु असल्याचा आरोप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज पत्रकार परिषदेत नुकताच केला आहे.या सोबत त्यांनी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे,नगरसेवक कैलास जाधव,माजी नगरसेवक बबलू वाणी,यांच्या कामाचे वाभाडे काढले असून आणखी आठ दिवसांनी आपण पुन्हा एकदा पत्रकार परिषद आयोजित करून उर्वरित पत्रपरिषदेचा भाग पूर्ण करू असे सांगून कोल्हे गटाला ऑक्सिजनवर ठेवले आहे.

“विजय कन्ट्रक्शन कडून बिल काढण्याचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी दीड लाख रुपये घेतले त्या वेळी त्यांच्या युवा नेत्याने गुरुद्वारा रोड वरील कार्यालयात त्यांच्यावर खूप तोंडसुख घेतले होते,मात्र त्यानंतर त्यांनी अशी काय जादू केली व त्यांना उपनगराध्यक्ष पदाची बिदागी मिळाली” हे त्यांनी व त्यांच्या नेत्यांनी जाहीर करावे-नगराध्यक्ष विजय वहाडणे,कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव नगरपरिषदेने नुकतीच शहरातील सुमारे एकतीस रस्त्यांची कामे मंजुरीसह जवळपास एकोणतीस विषय मंजुरीसाठी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती त्यात भाजप कोल्हे गटाने शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांच्या मंजुरीसाठी आधी स्थायी व नंतर विशेष सर्वसाधारण सभेत कोलदांडा घातल्याने वादंग निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर नुकत्याच संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी भ्रष्ट नगरसेवकांचे नावे घेऊन आरोप करण्याचे आव्हान दिले होते.त्यावर पत्रकार परिषद घेऊन वहाडणे यांनी आपण कोल्हे गटाने मागणी केल्याप्रमाणे आता या पुढे पत्रकार परिषद घेऊनच भ्रष्ट नगरसेवकांची नावे जाहीर करू असे आव्हान दिले होते.त्या प्रमाणे आज दुपारी चार वाजता कोपरगाव नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज पत्रकार परिषदेचे आयोजन वरील माजी नगराध्यक्ष,नगरसेवक यांचेवर प्रतिहल्ला प्रतिहल्ला चढवला आहे.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आपली नावे जाहीर करण्याची इच्छा नव्हती.राष्ट्रवादीच्या नगरसेवक संदीप वर्पे यांनी पहिल्या सर्वसाधारण सभेत आपल्याला नावे घेण्यापासून रोखले होते.मात्र मागील सभेत कोल्हे गटाचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,नगरसेवक योगेश बागुल,रवींद्र पाठक,अनिल आव्हाड यांनी थेट आव्हान दिल्याने आपण ते स्विकारले आहे.व आज या पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,”क्रीडांगणाच्या आरक्षणात उठविण्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जाधव यांनी केला होता.व “आपण भ्रष्टाचारास पाठिंबा देऊ शकत नसल्याचा” आव आणला होता.व “काही लोक आपल्याकडे या आरक्षणासाठी लाच घेऊन आले होते” असा आरोप केला होता.त्यामुळे या प्रकरणात जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम कोल्हे गटाने केले होते.त्यामुळे याला उत्तर देण्याचे दायित्व आपल्यावर येऊन पडले होते.त्यामुळे आता यात दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होणे गरजेचे होते.त्यामुळे जाधव यांनी अशा माणसाच्या विरुद्ध आता गुन्हा दाखल करावा असे आव्हान नगराध्यक्ष वहाडणे यांनी दिले आहे.व याच कोल्हे गटाने आरक्षणाच्या नावावर या आधी अनेक आरक्षणे उठवली असल्याचा दाखला देताना नयनकुमार (बबलू) वाणी यांचा दाखला दिला आहे.व अडीच एकरवरील आरक्षण उठवले असल्याचा थेट हल्ला केला आहे.व त्या वेळी कोल्हे कुटुंबाला मैदानांची गरज वाटली नाही.मात्र गिरमे यांची हीच क्रीडांगणाची जमीन खरेदी करण्यासाठी अनेक वेळा कोल्हे गटाचे आजी माजी भांडवलदार पदाधिकारी गेले होते हि बाब त्यांनी का झाकून ठेवली आहे? त्या वेळी त्यांना पोलिसांना मैदानांची गरज वाटली नाही का ? असा हल्ला चढवला आहे.कोपरगावचे क्रीडांगण आपल्या शैक्षणिक संस्थेत घेऊन जाताना त्यांना तालुक्यातील क्रीडापटूंचा का विसर पडला होता ? जाधव हे,”जलशुद्धीकरण केंद्राजवळ अतिक्रमण काढून टाका” म्हणतात पण नाव घेत नाही.याचे कारण काय ? त्याच वेळी आता शहरातील प्रत्येक अतिक्रमण काढताना नागरिक,”पहिले कैलास जाधव यांचे जलशुद्धीकरण केंद्राजवळचे अतिक्रमण काढा” व “मग,”आमचे हटवा” अशी भुमिका घेत आहे.आपण आता हे अतिक्रमण काढण्याचे पत्र मुख्याधिकाऱ्यांना दिले असल्याची आठवणही त्यानी करून दिली आहे.

दरम्यान त्या नंतर त्यांनी आपला मोर्चा उपनगराध्यक्ष सप्नील निखाडे यांचेकडे वळवला व त्यांनी,”विजय कन्ट्रक्शन कडून बिल काढण्याचे दीड लाख रुपये काढले त्या वेळी त्यांच्या युवा नेत्याने गुरुद्वारा रोड वरील कार्यालयात त्यांच्यावर खूप तोंडसुख घेतले होते,मात्र त्यानंतर त्यांनी अशी काय जादू केली व त्यांना उपनगराध्यक्ष पदाची बिदागी मिळाली” हे त्यांनी व त्यांच्या नेत्यांनी जाहीर करावे असे आव्हान त्यांनी दिले आहे.या शिवाय त्यांनी अनेक ठेकेदारांना असाच त्रास दिला आहे. त्यांना गतवर्षी आपण राहिलेले काम करण्यासाठी निमंत्रण दिले त्यावेळी पुन्हा कोल्हे गटाच्या त्रासदायक नगरसेवकांचा विषय निघाला त्या वेळी त्यांनी,”आपण त्या नगरसेवकांचा त्यांच्या नेत्यांकडून बंदोबस्त केला असल्याचे सांगितले होते.विजय कन्ट्रक्शनला पुन्हा फोन करून काम करण्यासाठी निमंत्रण दिले होते.त्यावेळी त्यांनी विजय कन्ट्रक्शन च्या ठेकेदाराने,”आता या पुढे आता कोल्हे गटाचे नगरसेवक आपल्याला त्रास देणार नाही,आपण त्यांचा बंदोबस्त केला असल्याची” कबुली दिली होती असा गोप्यस्फोट केला आहे.व ते यापुढे त्रास देणार नाही असे आश्वासन दिले होते.

माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी शुभम भावसार या ठेकेदारांच्या नावावर काम घेऊन ते स्वतःच केले होते.हि बाब आपल्याला भावसार यांनीच सांगितली होती.व नंतर वाजे आपल्याकडे अनेक वेळा बिलासाठी चकरा मारत,विनंती करत होते”.मात्र आपण ते काम झाले की नाही याची खात्री करूनच ‘ते’ बिल काढले होते.मध्यन्तरी वाजे यांनी एका जबाबदार अधिकाऱ्यास धमकावले होते.त्याबाबत जेष्ठ नगरसेवक रवींद्र पाठक यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.मात्र हीच बाब माझ्याबाबत घडली असती तर कोल्हे गटाच्या नगरसेवकांची प्रतिक्रिया काय असती ? असा प्रतिसवाल केला आहे.

दरम्यान रस्ते मंजूर करण्यास विरोध केल्याने संतप्त नगरसेवक शिवाजी खांडेकर हे आपल्या दालनात आले व त्यांनी रस्ते नामंजूर करणाऱ्या त्यांच्याच नगरसेवकांवर शिव्यांची लाखोली वाहून तोंडसुख घेतले.त्यावर त्यांना शांत करण्यासाठी त्यांना अखेर आरोग्य विभागाचे सभापतीपद बहाल केले आहे-नगराध्यक्ष विजय वहाडणे

त्यांनी पुढे माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांचा समाचार घेताना म्हटले आहे की,”बागुल यांच्या प्रभागात ८४ लाख रुपयांच्या गटारीचे काम होते.त्यावेळी त्यांनी आपल्याशी संपर्क केला व ते काम ज्ञानेश्वर गोसावी हे ठेकेदारास द्यावे अशी मागणी केली होती.त्यावेळी त्यांनी हे आपल्या प्रभागातील काम सोडून अन्य कामांना आक्षेप घेतला मात्र या कामास आक्षेप घेतला नाही.कारण उघड होते.मात्र ज्या वेळी हे काम आपल्या हातातून जात आहे असे त्यांच्या लक्षात आले त्या वेळी त्यांनी सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला.हि सर्व कामे मिळविण्यासाठी युवा नेत्याने निविदा भरण्यासाठी दहा लाखांचा निधी पुरवला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.व हि कामे आपल्याला मिळत नाही म्हटल्यावर भ्रष्टाचाराचा कांगावा केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.आधी त्यांच्या प्रभागातील कामे करण्यास मंजुऱ्या दिल्या मात्र जनतेच्या महत्वाच्या रस्त्यांचा विषय आला तेंव्हा यांना विरोधाची ‘कळ’ दाटून आली व त्यांनी विरोध सुरु केला असल्याचे म्हटले आहे.आपण सर्वसाधारण सभेत,”तुम्हाला डी.पी.रोड,तळजा भवानी रोड,येवला रोड आदी कामे आक्षेपार्ह वाटत असतील तर रद्द करा अशी सुचना संदीप वर्पे व आपणही केली होती मात्र त्यांनी त्यावेळी तसे होऊ दिले नाही.व आज पत्रके वाटून दोन-तीन कामे रद्द करण्याचा बनाव करत आहे.जे काम जेवढे होते तेवढेच बिल बांधकाम विभाग काढतो याचा त्यांनी पुनुरूउच्चार केला आहे.व आज अज्ञानातून अर्थ संकल्प मंजूर करण्याचा बनाव करून आपलेच पितळ उघडे करत आहे.अर्थ संकल्प हा मंजूर करायचा नसतो तर तो अधिकांऱ्यानी सभागृहाला अवगत करायचा असतो मात्र हि साधारण बाब या “मूर्खांना” कळत नसल्याचा घणाघात त्यांनी कोल्हे गटाच्या उपनगराध्यक्ष निखाडे यांचेवर केला आहे.

त्यानंतर त्यांनी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांचा समाचार घेताना म्हटले आहे की,”त्यांच्या काळात पप्पू पडियार यांच्या “त्या” मागणीला वैतागून विक्की जोशी व पप्पू जोशी या ठेकेदारांनी पालिकेत काम करणे सोडून दिले होते.माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांना शहराच्या विकासाशी काही देणे-घेणे नाही.शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास त्यांनी सातत्याने विरोध केला आहे.पालिकेचे अधिकारी,कर्मचारी यांना दबाव आणून विरोध केला आहे.व अतिक्रमण करणाऱ्यांना कायम पाठीशी घातले आहे.निसर्ग कन्सल्टन्सी यांचे काम त्यांनी कोणतीही नोटीस न देता काढून घेतले होते.त्या कंपनीने त्या मुळे दुखावले जाऊन न्यायालयात धाव घेतली आहे.व त्या कंपनीला भरपाई पोटी दीड कोटींचा भुर्दंड पालिकेला बसण्याची शक्यता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून देऊन यास कोण जबाबदार आहे असा सवाल केला आहे.हि जबाबदारी निच्छित करून सातभाई यांचेकडून हि भरपाई वसूल करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

माजी मंत्री कोल्हेचे एक समर्थक माजी नगराध्यक्ष यांनी शिंदे-शिंगीनगर वसवले व त्या ठिकाणी खडकी येथील पाण्याची टाकी पळवली व आपल्या प्लॉटची विक्री करून लाखो रुपये कमावले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.आणि कोल्हे समर्थकांना त्या साठी सत्ता हवी असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान त्यांनी एका प्रश्नात आपल्याला,”नगरपरिषद समजायला उशीर झाल्याने आपण हि कामे करण्यास उशीर झाल्याची” कुठलाही आडपडदा न ठेवता कबुली दिली आहे.

दरम्यान रस्ते मंजूर करण्यास विरोध केल्याने संतप्त नगरसेवक शिवाजी खांडेकर हे आपल्या दालनात आले व त्यांनी रस्ते नामंजूर करणाऱ्या त्यांच्याच नगरसेवकांवर शिव्यांची लाखोली वाहून तोंडसुख घेतले.त्यावर त्यांना शांत करण्यासाठी त्यांना अखेर आरोग्य विभागाचे सभापतीपद बहाल केल्याचा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आरोप करून कोल्हे गटाचे पुरते वस्रहरण केले आहे.व आगामी काळात आपल्यावर बेअब्रू केल्याचे आरोप करून न्यायालयात जाण्याच्या धमक्या दिल्या जातील असे सूतोवाच केले आहे.व त्यासमर्थनार्थ त्यांनी चारोळ्या ऐकवल्या आहेत.

“अब्रू नुकसानीच्या दावा माझ्यावर अवश्य करावा”

“पण”अब्रू असल्याचा थोडा तरी पुरावा द्यावा”

असे म्हणून पत्रकार परिषदेचा समारोप केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close